CCTP अंतिम ऑनलाईन परीक्षा ही MS-CIT अंतिम ऑनलाईन परीक्षेनंतर लगेच १० मिनिटांची असेल.
परीक्षा पात्रता:
- MS-CIT आणि CCTP दोन्ही अभ्यासक्रम ERA प्रणालीत पूर्ण केलेले असावेत.
- निवडलेल्या भाषेत व गतीनुसार अंतर्गत सत्रातील टायपिंग वेग ३० किंवा ४० शब्द प्रति मिनिट मिळवलेला असावा.
परीक्षा कालावधी: १० मिनिटे.
परीक्षा पद्धती: Remington कीबोर्ड लेआउट वापरून ऑनलाईन परीक्षा.
फेरपरीक्षा:
- MS-CIT व CCTP दोन्हींसाठी १+२ संधी.
- Re-exam Fee: रु. ५२७/-
महत्वाची सूचना: आपापल्या आस्थापनांच्या कर्मचारी नियुक्तीसाठीच्या नियमावलीत व जाहिरातीत “संगणक टायपिंग प्राविण्य पात्रता प्रमाणपत्रां”ची यादी वेळोवेळी घोषित करताना त्यात CCTP प्रमाणपत्राचा समावेश करण्यासंबंधीचे अधिकार त्या त्या सार्वजनिक, शासकीय, खासगी, सहकारी व सामाजिक आस्थापनांचे असतील.
