MS-CIT: Maharashtra State Certificate in Information Technology
एमएस-सीआयटी म्हणजे माहिती तंत्रज्ञानाची (आयटी) साक्षरता प्रदान करणारा अभ्यासक्रम आहे. याची सुरुवात सन २००१ मध्ये एमकेसीएल यांच्याकडून करण्यात आली. आयटी साक्षरता प्रदान करणारा हा अभ्यासक्रम संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय आहे.
२१ व्या शतकात ज्ञानविस्ताराचे अत्यंत परिणामकारक माध्यम म्हणून डिजिटलचे रूप (डिजिटलायझेशन), अनेक प्रकारच्या डिजिटल स्वरूपांच्या सहयोगाने उदयास आले. डिजिटली साठविणे, डिजिटली सादरीकरण, डिजिटली वितरण, डिजिटली प्रवेश (एक्सेस), डिजिटली संग्रहित करणे आणि डिजिटल व्यवस्थापन इत्यादी गोष्टी सुलभ झाल्या. साहजिकच खासगी, व्यावसायिक आणि सामाजिक जीवनात प्रत्येकाला या सर्व गोष्टी अत्यावश्यक झालेल्या आहेत. २१ व्या शतकात जगण्याच्या पद्धतीमध्ये असा एक क्रांतिकारी बदल झालेला आहे.