MS-CIT

MS-CIT म्हणजे माहिती तंत्रज्ञानाची (आयटी) साक्षरता प्रदान करणाऱ्या अभ्यासक्रमाची सुरुवात महाराष्ट्रात MKCL कडून सन २००१ मध्ये करण्यात आली. २१ व्या शतकात आयटी साक्षरता प्रदान करणारा हा अभ्यासक्रम संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय झालेला आहे. ज्ञानविस्ताराचे अत्यंत परिणामकारक माध्यम म्हणून डिजिटलचे रूप (डिजिटलायझेशन), अनेक प्रकारच्या डिजिटल स्वरूपांच्या सहयोगाने उदयास आले. डिजिटली साठविणे, डिजिटली सादरीकरण, डिजिटली वितरण, डिजिटली प्रवेश (एक्सेस), डिजिटली संग्रहित करणे आणि डिजिटल व्यवस्थापन इत्यादी गोष्टी सुलभ झाल्या. साहजिकच खासगी, व्यावसायिक आणि सामाजिक जीवनात प्रत्येकाला या सर्व गोष्टी अत्यावश्यक झालेल्या आहेत. २१ व्या शतकात जगण्याच्या पद्धतीमध्ये असा एक क्रांतिकारी बदल होऊन, माहिती तंत्रज्ञानाची जागरूकता, साक्षरता, कार्यक्षमता आणि उपयोगितेमुळे सर्व सामान्यांमध्ये असलेली डिजिटल संदर्भातील दुफळी, परिणामकारी ज्ञान व प्रगतीच्या संधी यांच्यामध्ये एक सेतू निर्माण झालेला आहे. २१ व्या शतकात प्रत्येकाला नोकरीची तयारी करण्यात सकारात्मकता निर्माण करणे, समाजात योग्यरीतीने वावरणे आणि आत्मविश्वासाला चालना देण्यात हा अभ्यासक्रम यशस्वी झालेला आहे.

या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या गोष्टी:
  1. MKCL द्वारे ई-लर्निंगशी आधारित स्वतः अभ्यास करण्यासाठी सोयीची अशी, सर्वांसाठीची ई-लर्निंगमधील क्रांती (ERA).
  2. बसल्या जागीच सराव सत्र
  3. प्रमाणीकृत व्यावसायिकांकडून शिकण्याची सुविधा
  4. शैक्षणिक संवाद, मूल्यमापन आणि सहकार्य
  5. वाचायला आणि समजून घेण्यासाठी उच्चदर्जाची सचित्र पुस्तके