MS-CIT सुधारित शुल्क संरचना - १ जून २०२५ पासून लागू
महत्त्वाचे मुद्दे:
* वर नमूद केलेले शुल्क अधिकृत शिक्षण केंद्र (ALC) आणि सॅटेलाइट सेंटर येथे दिल्या जाणाऱ्या MS-CIT अभ्यासक्रमाच्या सर्व पद्धतींसाठी लागू आहे.
* शुल्कामध्ये अभ्यासक्रम शुल्क, परीक्षा शुल्क आणि प्रमाणपत्र शुल्क समाविष्ट आहे.
* कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय कधीही शुल्कात बदल करण्याचा अधिकार MKCL राखून ठेवते.
* वर नमूद केलेले शुल्क अधिकृत शिक्षण केंद्र (ALC) आणि सॅटेलाइट सेंटर येथे दिल्या जाणाऱ्या MS-CIT अभ्यासक्रमाच्या सर्व पद्धतींसाठी लागू आहे.
* शुल्कामध्ये अभ्यासक्रम शुल्क, परीक्षा शुल्क आणि प्रमाणपत्र शुल्क समाविष्ट आहे.
* कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय कधीही शुल्कात बदल करण्याचा अधिकार MKCL राखून ठेवते.
---
MS-CIT Multi-Instalment Mode – विद्यार्थी माहिती आणि नियम
MS-CIT Multi-Instalment Mode मुळे गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम अधिक सुलभ बनतो. कारण कोर्सचे एकूण शुल्क सोप्या, टप्प्याटप्प्याने भरण्याची सुविधा उपलब्ध होते. हा उपक्रम महाराष्ट्रभर डिजिटल साक्षरता आणि डिजिटल समावेशन वाढविण्यात मदत करतो. Multi-Instalment mode 1st January 2026 पासून लागू.
उद्देश
- ज्या विद्यार्थ्यांना MS-CIT चे शुल्क एकदाच किंवा दोन हप्त्यांत भरणे शक्य नाही, अशांना सुलभ हप्त्यांची सुविधा उपलब्ध करून देणे.
- डिजिटल समावेशन आणि डिजिटल सक्षमता अधिक व्यापक करणे.
पात्रता
विद्यार्थी खालील अटी पूर्ण केल्यास पात्र असतील:
शाळेचा प्रकार
- सरकारी शाळांतील विद्यार्थी
- अनुदानित शाळांतील विद्यार्थी
- RTE अंतर्गत प्रवेश घेतलेले विद्यार्थी
शैक्षणिक पात्रता
8वी पासून पदवीपर्यंत शिकणारे विद्यार्थी पात्र आहेत.
आवश्यक दस्तऐवज
प्रवेशाच्या वेळी खालीलपैकी कोणतेही एक दस्तऐवज सादर करावे:
- बोनाफाईड प्रमाणपत्र
- RTE प्रवेशाचा पुरावा + बोनाफाईड प्रमाणपत्र
- 10वी नंतरचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (School Leaving Certificate)
10वी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त अट
विद्यार्थी सध्या ज्या महाविद्यालयात/संस्थेत शिकत आहेत त्या संस्थेचे बोनाफाईड प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
शुल्क आणि हप्ते
| क्षेत्र | एकूण शुल्क | प्रत्येक सेशनचा हप्ता |
|---|---|---|
| MMRDA | ₹6000 | ₹120 |
| Non-MMRDA (ठाणे/पालघर/रायगड) व PMRDA | ₹5500 | ₹110 |
| उर्वरित महाराष्ट्र | ₹5000 | ₹100 |
हप्ते
- एकूण शुल्क जास्तीत जास्त 50 हप्त्यांमध्ये भरता येईल.
ERA प्रवेश (Access)
- संबंधित सेशनचा हप्ता भरल्यानंतरच त्या सेशनचा ERA प्रवेश दिला जाईल.
- विद्यार्थी एकावेळी एकापेक्षा जास्त सेशन्सचे हप्ते भरू शकतात; त्या प्रमाणे ERA मध्ये प्रवेश दिला जाईल.
परतफेड धोरण (Refund Policy)
- हप्ते (MFO सहित) कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाहीत व अन्य विद्यार्थ्यांसाठी हस्तांतरित करता येणार नाहीत.
अभ्यासक्रम कालावधी
- सुलभ हप्त्यांद्वारे विद्यार्थी साधारणतः ५ ते ६ महिन्यांत MS-CIT अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात.
महत्वाच्या सूचना
- वेळेवर हप्ता भरल्यास ERA प्रवेश सातत्याने उपलब्ध राहतो.
- प्रवेशाच्या वेळी सर्व आवश्यक दस्तऐवज सादर करणे बंधनकारक आहे.
