CCTP बद्दल

MS-CIT विद्यार्थ्यांची विविध क्षेत्रातील डिजिटल रोजगारक्षमता वाढावी या उद्देशाने MS-CIT अभ्यासक्रम आणि अंतिम ऑनलाईन परीक्षेसोबत “Certificate of Computer Typing Proficiency (CCTP)” अर्थात “संगणक टंकलेखन प्राविण्य प्रमाणपत्र” हा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. हा नवीन अभ्यासक्रम, त्याची MSBTE तर्फे अंतिम ऑनलाईन परीक्षा आणि ती उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना संगणक टंकलेखन/टायपिंग प्राविण्याचे स्वतंत्र शासकीय प्रमाणपत्र असे या सुविधेचे स्वरूप आहे. संगणक टायपिंग प्राविण्याचे फायदे केवळ “काम लवकर पूर्ण होणे” यापुरते मर्यादित नाहीत. हे फायदे दोन प्रकारचे असतात – काही स्वयंस्पष्ट म्हणजे सहज दिसणारे तर काही अप्रत्यक्षपणे मिळणारे.

स्वयंस्पष्ट फायदे:

  • अधिक उत्पादकता: जलद टायपिंगमुळे अधिक काम कमी वेळात करता येते.
  • अचूकता: टायपिंग प्राविण्य असलेले विद्यार्थी कमी चुका करतात.
  • ‘कसे’पेक्षा ‘काय’वर लक्ष: टायपिंग सहज झाल्याने लक्ष विषयावर केंद्रित राहते.
  • व्यावसायिक कौशल्याची निशाणी: टायपिंग प्राविण्य हे आजही एक महत्वाचे डिजिटल कौशल्य समजले जाते.

अप्रत्यक्ष फायदे:

  • कमी थकवा व ताणमुक्ती: इर्गोनॉमिक टायपिंगमुळे हातांवरील ताण कमी होतो.
  • वेगवान संवाद: ईमेल्स, ऑनलाईन चॅट्समध्ये प्रतिसाद देताना वेग वाढतो.
  • आत्मविश्वास: टायपिंगमुळे भाषिक व लेखन कौशल्यात सुधारणा होते.
  • डिजिटल शिक्षणातील कार्यक्षमता वाढते.
  • विविध करिअरमध्ये उपयुक्तता: डेटा एन्ट्री, ऑफिस असिस्टंट, प्रोग्रामर, पत्रकार, प्रॉम्प्ट इंजिनीअर इत्यादी क्षेत्रात.