शुल्क रचना

MS-CIT सुधारित शुल्क संरचना - १ जून २०२५ पासून लागू

ही शुल्क रचना केवळ १५ जुलै २०२६ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीसाठी लागू राहील. दिनांक १ डिसेंबर २०२६ पासून शालेय विद्यार्थ्यांसाठी (इयत्ता ५ वी ते १० वी) नियमित शुल्क रचना लागू होईल.

विभाग ALC सेवा शुल्क (₹) MFO (GST सहित) (₹)
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) अंतर्गत येणारे मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्हे ₹3,575/- ₹1,425/-
ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतील MMRDA क्षेत्राबाहेरील भाग तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) क्षेत्र ₹3,075/- ₹1,425/-
महाराष्ट्रातील उर्वरित क्षेत्र ₹2,575/- ₹1,425/-

महत्त्वाचे मुद्दे:

* अधिकृत लर्निंग सेंटर (ALC) आणि सॅटेलाइट सेंटर येथे ऑफर केल्या जाणाऱ्या MS-CIT कोर्सच्या सर्व पद्धतींसाठी वर नमूद केलेली फी लागू आहे
* एकूण शुल्कामध्ये कोर्स शुल्क, परीक्षा शुल्क आणि प्रमाणन शुल्क यांचा समावेश आहे
* MKCL कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय वर्षभरातील अभ्यासक्रमांच्या शुल्कात फेरफार करण्याचा अधिकार राखून ठेवते आणि अशा कोणत्याही फेरबदलासाठी MKCL कोणासही जबाबदार राहणार नाही.